Homeउद्योगकॅपिटल मार्केट'मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका -...

कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी – चिंचवड महानगरपालिका हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रम

मुंबई, दि. १० : देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्जरोखे ‘इश्यू’ केले. अशा ‘ कॅपिटल मार्केट’ मधून निधी उभारणारी पिंपरी- चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील बीएसई आंतरराष्ट्रीय सभागृहात पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग, अप्पर मुख्य सचिव असिम गुप्ता, प्रधान सचिव डॅा. के गोविंदराज,बॅाम्बे स्टॅाक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम रामामूर्ती उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पिंपरी – चिंचवड महापालिकेने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी भरभरून गुंतवणूक केली. कर्ज रोखे इश्यू झाल्यानंतर काही मिनिटातच १०० कोटी रुपयांची गुंतवणूक याद्वारे करण्यात आली. त्यानंतर पाच पटीने गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली. यावरून गुंतवणूकदारांचा हरित कर्ज रोख्यांवरील विश्वास दिसतो. या रोख्यांचा कालावधी ५ वर्षांचा असून त्यासाठी ७.८५ टक्के स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

शेअर बाजारात कर्जरोखे ‘ लिस्टिंग ‘ करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. ‘ कॉर्पोरेट’ अटी शर्तींची पूर्तता करीत ‘ लिस्टिंग’ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या निधीतून पायाभूत सोयी सुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. ही कामेही हरित पद्धतीची, पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाची असणार आहेत. केंद्र शासनाकडूनही हरित कर्ज रोखे इश्यू केल्यामुळे २० कोटीचे प्रोत्साहनपर अनुदानही महापालिकेला प्राप्त झाले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणेचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमपूर्वी बेल वाजवून कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग करण्यात आले.

हरित कर्ज रोख्यांविषयी थोडेसे..

हरित कर्ज रोख्यांद्वारे महापालिकेने २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) च्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हरित कर्ज रोखे इश्यू करण्यात आले होते. गुंतवणूकदारांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेला विश्वास अधोरेखित करत, इश्यू सुरु होताच केवळ एका मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला, तर एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला ५.१३ पट अधिक मागणी मिळाली. हरित कर्ज रोखे इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त संस्थाकडून ‘एए +’ (AA+) पतमानांकन प्राप्त झाले आहे. हरित कर्ज रोख्यातून उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक दरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोंदणी विभाग मुद्रांक शुल्क सवलतींची थेट मासिक छाननी करतो

0
पुणे: महाराष्ट्र नोंदणी आणि मुद्रांक विभागाने राज्यभरातील सर्व नोंदणी कार्यालयांना मुद्रांक शुल्क सवलत किंवा सवलतींसह दस्तऐवजांची तपासणी प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक...

शिक्षक पात्रता चाचणी अनिवार्य करण्याच्या विरोधात 24 नोव्हेंबर रोजी शिक्षकांनी आंदोलनाची योजना आखली आहे

0
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्याच्या राज्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांनी 24 नोव्हेंबर रोजी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी...

इंधन वाहून नेणाऱ्या टँकरच्या चालकाच्या केबिनला आग, अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी...

0
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास इंधनाच्या टँकरच्या चालकाच्या केबिनला आग लागल्याने अग्निशमन दलाने वेळीच कारवाई केल्याने...

खराब रस्ते आणि रहदारीची कोंडी असतानाही पुण्यात हाय-एंड कारची मागणी जास्त आहे

0
पुणे: खराब रस्ते, खड्डे आणि न संपणारे खड्डे यामुळे हायएंड गाड्या घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी कमी झालेली दिसत नाही.पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO)...

AI-आधारित निवारण प्रणाली दिव्यांग लोकांसाठी सुरू होते

0
पुणे: राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाने व्हॉट्सॲपवर एआय-संचालित चॅटबॉट सादर केला आहे, ज्याची रचना दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजनांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि स्क्रीनवर फक्त एका स्पर्शाने...

error: Content is protected !!