Homeआरोग्यStar Health Insurance| देशभरात स्टार हेल्थची कॅशलेस सेवा बंद? AHPI आक्रमक, रुग्णांमध्ये...

Star Health Insurance| देशभरात स्टार हेल्थची कॅशलेस सेवा बंद? AHPI आक्रमक, रुग्णांमध्ये संभ्रम जाणून घ्या सविस्तर

देशातील रुग्णालयांसाठी आणि रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स ऑफ इंडिया (AHPI) ने मोठा आरोप केला आहे की स्टार हेल्थ इन्शुरन्स ने देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुविधा थांबवल्या आहेत.त्यामुळे रुग्णालयांना त्रस्त आणि संतापलेल्या रुग्णांचा सामना करावा लागत आहे.

AHPI ने सोमवारी दिलेल्या निवेदनात सांगितले की, या निर्णयामुळे रुग्णांना सर्वात मूलभूत हक्क म्हणजेच कॅशलेस ॲडमिशन आणि उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागत आहे.

AHPI नी केलेली मागणी

AHPI ने स्टार हेल्थला तातडीने या सर्व रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, नवीन रुग्णालयांच्या एम्पॅनेलमेंटची प्रक्रिया वेगवान करण्याची विनंती केली आहे. AHPI च्या म्हणण्यानुसार, यामुळेच रुग्णांना अखंडित आरोग्यसेवा मिळेल आणि त्यांचा आर्थिक ताण कमी होईल.

स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या कॅशलेस सुविधेच्या असुविधांमुळे महाराष्ट्रातील अनेक मोठ्या रुग्णालयांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. या समस्येमुळे अनेक रुग्णालयांनी स्टार हेल्थच्या ग्राहकांना कॅशलेस सेवा देणे बंद केले आहे, ज्यामुळे विमाधारक आणि रुग्णालये दोन्ही अडचणीत आले आहेत.

या असुविधेची मुख्य कारणे:

दरांवरून वाद : स्टार हेल्थ कंपनीने रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या उपचारांचे दर कमी केले आहेत, ज्यामुळे रुग्णालये असमाधानी आहेत.

विमा दाव्यांची प्रक्रिया : अनेक रुग्णालयांनी विमा दाव्यांच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचा आणि त्यामध्ये अनावश्यक अडथळे येत असल्याचा आरोप केला आहे.

कॅशलेस सेवा बंद करण्याचा इशारा : काही रुग्णालयांच्या संघटनांनी, विशेषतः असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडिया (AHPI) ने, स्टार हेल्थने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास कॅशलेस सेवा पूर्णपणे बंद करण्याचा इशारा दिला आहे.

या परिस्थितीमुळे स्टार हेल्थच्या लाखो पॉलिसीधारकांना मोठा त्रास होत आहे, कारण त्यांना आपत्कालीन परिस्थितीतही आधी स्वतः पैसे भरून नंत प्रतिपूर्ती साठी अर्ज करावा लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी विमा कंपनी आणि रुग्णालयांच्या संघटना यांच्यात चर्चा सुरू आहे.

देशातील नामवंत रुग्णालयांना फटका

AHPI ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही प्रमुख रुग्णालयांमध्ये ही सुविधा थांबवण्यात आली आहे. यात केअर हॉस्पिटल्स (रामनगर व विशाखापट्टणम), मणिपाल हॉस्पिटल्स (दिल्ली व गुरुग्राम), मॅक्स हॉस्पिटल्स (उत्तर भारत), मेट्रो हॉस्पिटल (फरीदाबाद), मेदांता हॉस्पिटल (लखनऊ), राजीव गांधी कॅन्सर हॉस्पिटल (दिल्ली), सरव्होदय हॉस्पिटल (फरीदाबाद), यथार्थ हॉस्पिटल्स यांचा समावेश आहे.

याशिवाय, स्टार हेल्थने अनेक प्रमुख रुग्णालयांना नेटवर्कमध्ये सामील करण्यास नकार दिला आहे. यात फोर्टिस हॉस्पिटल (मानेसर), ज्युपिटर हॉस्पिटल (इंदूर), मॅक्स हॉस्पिटल (द्वारका), मेदांता हॉस्पिटल (नोएडा) यांचा समावेश आहे. AHPI चा आरोप आहे की, यामुळे रुग्णांना कॅशलेसऐवजी रिम्बर्समेंट मार्गाने पैसे भरावे
लागतात, ज्यामुळे उपचारात उशीर होतो आणि हेल्थ इन्शुरन्सचा मुख्य हेतूच अपयशी ठरतो.

AHPI चे म्हणणे

HPI चे महासंचालक गिरधर ग्यानी आणि IMA हॉस्पिटल बोर्डचे अध्यक्ष अबुल हसन यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की,

“रुग्णांनी हेल्थ इन्शुरन्स याच अपेक्षेने घेतलेले असते की त्यांना रुग्णालयात कॅशलेस सुविधा मिळेल. प्रीमियम घेतल्यानंतर अशी सुविधा थांबवणे अन्यायकारक आहे. त्यामुळे रुग्ण कुटुंबांना हॉस्पिटलमध्ये पैसे जमवण्यासाठी धावपळ करावी लागते. स्टार हेल्थने तातडीने विश्वास पुन्हा प्रस्थापित करून ही सेवा सुरू करावी.”

स्टार हेल्थने मांडली बाजू

स्टार हेल्थ इन्शुरन्सने प्रत्युत्तर देत म्हटले की,

“आमच्या नेटवर्क पार्टनर्सकडून कॅशलेस सस्पेन्शनबाबत कोणतीही अधिकृत तक्रार आम्हाला मिळालेली नाही. AHPI ने अचानक प्रेस नोट काढून रुग्णांमध्ये अनावश्यक गोंधळ निर्माण केला आहे.”

कंपनीने ग्राहकांना आश्वासन दिले आहे की त्यांच्या हेल्थ इन्शुरन्समुळे त्यांचा उपचार अडथळा न येता सुरू राहील.

परिस्थिती गंभीर

सध्या देशभरातील अनेक रुग्णालये या परिस्थितीमुळे चिंतित आहेत. रुग्णांना उपचारासाठी आधी पैसे भरून नंतर क्लेम करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. AHPI ने सरकार आणि सर्व संबंधित संस्थांना विनंती केली आहे की रुग्णांचे हित जपून लवकर तोडगा काढावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जुन्नरमध्ये ताज्या बिबट्याच्या हल्ल्यात 27 वर्षीय तरुण जखमी

0
पुणे : जुन्नरच्या वडगाव आनंद गावात शनिवारी संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्याने पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावरील जंगलाच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे....

कोरड्या वायव्येकडील वाऱ्यांमुळे पुणे जिल्ह्य़ात तापमान एकांकिकेपर्यंत पोहोचते

0
पुणे: किमान तापमानात सातत्याने घसरण सुरूच राहिल्याने, रविवारी ग्रामीण पुण्यातील काही भागांमध्ये एक अंकी घसरण झाल्याने, हंगामातील सर्वात थंड सकाळ ठरली.हवेली हे ठिकाण सर्वात...

MVA च्या ‘अधिक अनुकूल’ सल्ल्या असूनही काँग्रेस BMC मध्ये एकट्याने जाणार आहे

0
पुणे: काँग्रेसने शनिवारी जाहीर केले की ते बृहन्मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, परंतु बिहारमध्ये पक्षाला नुकताच झालेला धक्का लक्षात घेऊन...

पिंपरखेड गावात बिबट्यासोबत झालेल्या चकमकीत महिला हादरली

0
पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड गावात शेतात काम करणाऱ्या महिलेला शुक्रवारी दुपारी काही अंतरावर असलेल्या झाडावरून अचानक बिबट्याने उडी मारल्याने तिला धक्काच बसला. घाबरलेली...

सव्र्हिस रोडमुळे प्रवाशांना धोकादायक महामार्गावर जाण्यास विलंब होतो

0
पुणे: नवले पुलाजवळील नर्हे वाय-जंक्शन येथे सेवा रस्ते बांधण्यास होणारा विलंब प्रवाशांना त्रास देत आहे जे म्हणतात की ते गर्दीच्या वेळी NH-48...

error: Content is protected !!