बदलापूर : शहरातील अनेक भागात विविध विकास कामे सुरू आहेत परंतु हे विकास कामे करत असताना नागरिकांच्या समस्यांचा कोणताही विचार केला जात नाही असेच दिसून येते. विकास काम करत असताना संबंधित विकास काम करणारा ठेकेदार हा आपल्या मनमर्जने काम करून हम करे सो कायदा या पद्धतीने काम करत असल्याचे दिसून येत आहे.
बदलापूर पश्चिम भागातील श्री कॉम्प्लेक्स तसेच भुयारी मार्ग जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. हे दोन्ही काम कोणता ठेकेदार देत आहे किंवा कोणत्या ठेकेदार कंपनी मार्फत काम होत आहे याबाबतची कोणतीही माहिती येथील नागरिकांना नाही किंवा विकास कामाबाबत माहिती देणार आहे फलक देखील या ठिकाणी उभारलेले नाही.
काम सुरू करण्यापूर्वी नागरिकांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल याचा कोणताही विचार न करता हम करे सो कायदा ह्या पद्धतीने संबंधित ठेकेदार काम करीत आहे. श्री कॉम्प्लेक्स जवळील बेलवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत नाल्याचे काम सुरू आहे. हा नाला कोणतीही माहिती न देता ठेकेदाराने खोदून ठेवलेला आहे. या भागातून बेलवली गावाकरिता जाणारा रस्ता आहे तसेच शेजारी नीलकंठ हिल्स उपवन हे गृह संकुल आहे आहे ज्या ठिकाणी दररोज शेकडो दुचाकी आणि चार चाकी वाहनांची वाहतूक होत असते. कोणतेही प्रकारचे सूचना वा कल्पना न देता नाल्याचे काम सुरू केले आहे.
शहरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विकास कामांवर नगरपालिका प्रशासनाच्या वचक नाही की काय अशीच चर्चा त्या निमित्ताने या भागातील रहिवाशांमध्ये होत आहे. जणू काही हम करे सो कायदा हा एकच कायदा या ठेकेदारांना लागू आहे की काय असे देखील येथील नागरिकांना आता वाटू लागले आहे.























