मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत आहे. राज्य गेल्या काही महिन्यात आयएएस, आयपीएस आणि पोलीस दलात बदल्या केल्या आहेत. मागील महिन्यात राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यानंतर आज (10 जून) पुन्हा एकदा 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयएएस आप्पासाहेब धुळाज यांची मंत्रालयात ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. महत्त्वाचे म्हणजे आज मंत्रिमंडळ बैठक पार पडल्यानंतर राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयएएस आप्पासाहेब धुळाज हे महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघात व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होते. मात्र आता त्यांची मंत्रालयातील ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आयएएस बाबासाहेब बेलदार हे छत्रपती संभाजी नगर विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त होते. मात्र आता त्यांची महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळात मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
1. नितीन पाटील (IAS:SCS:2007) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
3. लहू माळी (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
4. बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:२०१५) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5. मुरुगनंथम एम. (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. आदित्य जीवने (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. मिन्नू पी.एम. (IAS:RR:2021) सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. मानसी (IAS:RR:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.























