बदलापूर:
महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत कुळगांव बदलापूर नगरपरिषदेने नागरिकांसाठी एक महत्वाचे पाऊल उचलले असून, नगरपरिषदेच्या एकूण ४४ सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी https://rts.kbmc.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन विविध सेवा जसे की जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्न, जात दाखले, मालमत्ता कर भरणा, किरकोळ व्यावसायिक परवाने, विवाह नोंदणी, अशा अनेक प्रकारच्या सेवांसाठी घरबसल्या अर्ज करता येईल.
या उपक्रमामुळे नागरिकांना कार्यालयात वेळ खर्च करण्याची गरज नाही, गर्दी टळेल, तसेच सेवा वितरण जलद, पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने पार पडेल. कुठलीही सेवा निश्चित कालावधीत उपलब्ध व्हावी, ही सेवा हक्क कायद्याची प्रमुख जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी डिजिटल सेवा हे एक प्रभावी साधन ठरत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या डिजिटल सेवांचा सक्तीने व सवयीने वापर करावा, असे आवाहन कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
नगरपरिषदेचा हा स्मार्ट शासकीय सेवा या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, यामुळे नागरी सुविधा अधिक सुलभ, कार्यक्षम आणि जलद होतील.























