Homeताज्या बातम्याउल्हास नदी पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

उल्हास नदी पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई – जेथे अनेक वर्षे पूर आलेला नाही त्याठिकाणी जलसंपदा विभागाने पूर रेषेबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात आढावा घेताना उल्हास नदीकिनारी नकाशातील पूर रेषा आणि प्रत्यक्ष परिस्थिती याबाबत माहिती घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी उल्हास नदी पूर नियंत्रण रेषेबाबत मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावी असे निर्देश दिले आहेत.

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. स्थानिक आमदार किसन कथोरे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.गोविंदराज, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यात अनेक नद्यांच्या किनारी अनेक वर्षांमध्ये पूर आलेला नाही. तथापि पूर नियंत्रण रेषेमुळे विकासाला मर्यादा येत आहेत. सर्व नदीकिनारी पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करुन पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या सोबतच कुळगाव बदलापूर हद्दीतील बेलवली कात्रप रेल्वे क्रॉसिंग ओव्हरब्रिजबाबत एमएमआरडीएने तर दत्त चौक ते समर्थनगर पर्यंतच्या रेल्वे लाईनला समांतर ओव्हर ब्रिज बांधण्याच्या कामाबाबत नगर परिषदेने तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी. या कामाबरोबरच बदलापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी सॅटिस प्रकल्पाच्या कामास गती द्यावी. गॅरेज रोड ते होपलाईन पॉवर हाऊस बदलापूर पूर्व पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास गती द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. कांजूरमार्ग- ऐरोली- शिळफाटा- कटाई- बदलापूर मेट्रो या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा आढावा घेऊन सुरू असलेली प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

काळू धरणाच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. बदलापूर शहरात स्वतंत्र वीज उपकेंद्र असणे आवश्यक असल्याने प्रस्तावित टाटा पॉवर कंपनीच्या उपकेंद्रास लागणाऱ्या जागेला एमएमआरडीएने तातडीने मान्यता द्यावी, असे सांगून कुळगाव पोलीस स्टेशनसाठी एमआयडीसीच्या जागेबाबत तातडीने प्रस्ताव सादर करून गृह विभागाने त्यास मंजूरी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. कुळगाव मधील खाजगी मिळकतीवरील शाळेच्या अनधिकृत बांधकामाबाबत आरक्षणात बदल करून ती शाळा नगरपरिषदेने चालवण्यास घ्यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याव्यतिरिक्त कुळगाव बदलापूर परिसरात सुरू असलेल्या विविध स्थानिक प्रकल्पांचा मुख्यमंत्री यांनी आढावा घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोथरूड कायदा व सुव्यवस्थेबाबत मोहोळ आणि पाटील यांनी पुण्यातील उच्चपदस्थ पोलिसांची भेट घेतली, गुन्हेगारी...

0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले की, "आपण किंवा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड...

बीएसआयला 2038 पर्यंत भाडेतत्त्वावर जमीन, परंतु वतनदार सरकारकडून हक्क पुनर्संचयित करण्याची मागणी करतात.

0
पुणे: मुंढवा येथील महार वतन जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मूळ महार वतनदार कुटुंबांनी 2038 पर्यंत ही जमीन भारतीय बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया (BSI) ला भाडेपट्ट्याने...

इच्छूक उमेदवारांच्या कपिल पाटील यांच्याकडून मुलाखती.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार युतीसाठी प्रयत्नशील!

0
बदलापूर:कुळगांव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ८० हून अधिक इच्छूक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या. दरम्यान, केंद्र,...

या वर्षी जवळपास 4,000 सीईटी टॉपर्सनी राष्ट्रीय संस्थांसाठी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालये नाकारली

0
पुणे: महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी प्रवेशाच्या परिदृश्याने यावर्षी आश्चर्यकारक वळण घेतले, जवळजवळ 4,000 उच्च गुण मिळविणाऱ्या सामाईक प्रवेश चाचणी (CET) विद्यार्थ्यांनी राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश वगळण्याचा...

PMC पुनर्विकासापूर्वी जुन्या मालमत्तांच्या सुरक्षित पाडावासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते

0
पुणे : पुनर्विकास करावयाच्या मालमत्ता सुरक्षितपणे पाडण्याचे निर्देश पीएमसीने विकासकांना दिले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निर्देशांनुसार, विकासकांनी हे सुनिश्चित...

error: Content is protected !!