Homeटेक्नॉलॉजीठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत नागरिकांना घरपोच शासकीय सेवा - मुख्य...

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत नागरिकांना घरपोच शासकीय सेवा – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

८० विभागांच्या तब्बल ४०२ सेवा आता नागरिकांच्या दारी

 ठाणे – सामान्य नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारातच सहज, सुलभ आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘Door Step Delivery’ या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध सेवा मिळत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम लोकाभिमुख व परिणामकारक ठरत आहे.

सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दारी सेवा उपलब्ध करून देणे, हेच खऱ्या अर्थाने सुशासनाचे प्रतीक आहे. ‘Door Step Delivery’ उपक्रमाद्वारे आम्ही प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करत आहोत. हा उपक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी घरपोच जलद व सुलभ प्रशासकिय दाखले घेण्यासाठी ‘Door Step Delivery’ प्रणालीमार्फत सेवा घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

या प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या ४०२ प्रकारच्या शासकीय सेवा मिळू शकतात. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४ हजार १३ अर्ज आल्या असून, ३ हजार ६५९ नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे. उर्वरित १७० अपॉईंटमेंटवर काम सुरू असल्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी दिली.

या उपक्रमामार्फत मिळणाऱ्या प्रमुख सेवा व विभाग:
मृत्यू दाखला, जन्म दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला, ग्रामपंचायतीचा येणे बाकी नसल्याचा दाखला, विवाह नोंदणी दाखला, नमुना नं ८ चा दाखला (मालमत्ता फेरफार), निराधार योजनेसाठी वयाचा दाखला हे सर्व लोकहक्क सेवा आयोगांतर्गत येणारे हे सात दाखले ‘Door Step Delivery’ मार्फत देण्यात येत असून त्या व्यतिरिक्त इतर विभागाचे जसे जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, उद्योग आधार, जीवन प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज, पॅनकार्ड व दुरुस्ती, पासपोर्टसाठी शपथपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शेत मोजणी अर्ज, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, राजपत्र प्रकाशन, १५ वर्षाचे रहवासी प्रमाणपत्र, खाद्य परवाना जीवन प्रमाणपत्र, हयात प्रमाणपत्र, आभाकार्ड (आयुष्यमान भारत आरोग्य खाते), शेत मोजणी अर्ज / Farm Measurement Application, डिश टीव्ही डिटीएच रीचार्ज, शिष्यवृत्ती अर्ज (Scholarship Application), केंद्र सरकार ओबीसी प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, GST Form, Hotel Licence, टीकीट आरक्षण, निवासी शाळा, परदेशी शिष्यवृति, शासकीय वसतिगृह प्रवेश, अर्थ कुटुंब सहाय्य, नविन कौटुंबिक शिधापत्रिका, महाभरती, नोकरीसाठी नोंदणी (रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय), भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्रासाठी अर्ज अशा ४०२ सेवा तर महसूल विभाग, पोलीस/गृह विभाग, भूमि अभिलेख विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, समाज कल्याण व सामाजिक न्याय विभाग, शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, डिजिटल जीवन प्रमाण, आयकर विभाग, पासपोर्ट-परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, आरोग्य विभाग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय, जिल्हा परिषद अशा प्रशासकिय ८० विभागातील ‘Door Step Delivery’ या प्रणालीद्वारे घरपोच सेवा मिळू शकतात.

ग्रामपंचायतींच्या कार्यरत केंद्रचालक यांना ही जबाबदारी दिली असून यासाठी आपले सरकार सेवा केंद्र मधील केंद्रचालक यांच्यामार्फत कार्यान्वित आहेत. केंद्रचालक नागरिकांकडून वेळ ठरवून त्यांच्या घरी येतात, आवश्यक कागदपत्र स्कॅन करतात आणि ऑनलाइन सेवा प्रक्रिया पूर्ण करतात. सेवा मंजूर झाल्यावर संबंधित प्रमाणपत्र पुन्हा घरपोच पोचवले जाते.

अपॉईंटमेंट व मदतीसाठी तसेच अधिक माहितीसाठी:
नागरिकांनी https://thanedoorstep.in/ या संकेतस्थळावरून अपॉईंटमेंट घ्यावी किंवा मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक ८३८०८२२३३३ वर संपर्क साधावा.

“नागरिकांनी आपल्या सोयीसाठी या अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा, घरच्या घरी प्रमाणपत्रे व शासकीय सेवा मिळवून वेळ आणि खर्चाची बचत करावी,” असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
000

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जबाजारी तरुणाने इंद्रायणी नदीत उडी मारली

0
पुणे : मावळातील इंद्रायणी नदीत उडी घेऊन आकुर्डी येथील एका ४३ वर्षीय कर्जबाजारी तरुणाने मंगळवारी जीवन संपवले. शिवदुर्गा मित्र, लोणावळा आणि वाण्यजीव रक्षक, मावळ...

हायकोर्ट 8 जानेवारी रोजी सुरक्षिततेतील अंतर उचलणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणी करणार आहे

0
पुणे: राज्यातील लिफ्ट सुरक्षितता 1958 मध्ये तयार केलेल्या नियमांद्वारे शासित असतानाही, महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मुव्हिंग वॉक कायदा, 2017 ची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मुंबई...

ख्रिसमस, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकप्रियतेमध्ये विक्रमी वाढ करण्यासाठी जवळच्या वाहन चालवण्यायोग्य ठिकाणी मुक्काम

0
पुणे: कोरेगाव पार्कमधील संजना आणि रोहित ढोलके या दोन्ही एचआर व्यावसायिक जोडप्याने यावर्षी गोव्यातील त्यांच्या आवडत्या समुद्रकिनाऱ्यावर नवीन वर्षाचा रिंगण करण्याचा त्यांचा...

हिरवे इंधन नाही: MSRTC पुढील वर्षी 8,000 डिझेल बस आणण्यावर भर देणार

0
पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) पुढील वर्षी अतिरिक्त 8,000 डिझेल बसेससह आपल्या ताफ्याचा विस्तार करण्याच्या आशेने ई-बसला चालना देण्याच्या सरकारच्या...

पारदर्शक कारभारासाठी उत्तम पाया: वाघोली रहिवासी पीएमसी निवडणुकीपूर्वी मागण्यांचा चार्टर तयार करतात

0
पुणे: एकेकाळी परिघीय गाव असलेले वाघोली पुणे महानगरपालिका (पीएमसी) हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर शहराच्या पूर्वेकडील प्रमुख निवासी आणि आयटी हबमध्ये बदलले. तथापि, नागरी पायाभूत सुविधा...

error: Content is protected !!