बदलापूर :-
सालाबाद प्रमाणे यंदाही शिवसेनेच्या सौ. सुवर्ण सतीश साठे यांच्या वतीने वटपौर्णिमेनिमित्ताने वडाच्या झाडाची पूजा करायला आलेल्या महिलांना सुमारे 250 रोपांचे वाटप करण्यात आले शिवसेना शाखा प्रभाग क्रमांक सातच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मागील सुमारे आठ वर्ष प्रभागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये वटपौर्णिमेनिमित्त महिला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी विभागातील शिवशांती कॉम्प्लेक्स व भवानीशंकर बिल्डिंग जवळ येतात. वटवृक्षांची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात येतात, आलेल्या महिलेला मागील आठ वर्षापासून सातत्याने एक रोप वितरित केले जाते. मागील वर्षी या महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते. तुळस ही पूर्ण वेळ ऑक्सिजन देणारे झाड असून महिला दररोज तुळशीच्या झाडाची पूजा करतात यावर्षी आपण चार विविध प्रकारची रोपे आणून त्यांचे या महिलांना वाटप केले आहे यामध्ये प्रामुख्याने मनी प्लांट तुळस व फायकस तसेच रिबीन ग्लास या इनडोअर व आउटडोर शोभेच्या रोपांचे वाटप करण्यात आले. काही रोपेही शोभेची असून ती घराच्या आत मध्ये किंवा घराच्या बाहेर या दोन्ही ठिकाणी ठेवता येऊ शकतात. यापूर्वी वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते कारण वटपौर्णिमेनिमित्ताने महिला बाजारातून वडाची तोडलेली फांदी घेऊन येतात व त्याची पूजा करतात याचा बोध घेऊन आपण वडाच्या रोपाचे वाटप केले होते ज्यामुळे महिलांनी त्या रोपाचे घरी संगोपन करून पुढच्या वर्षी त्याचीच पूजा करावी हा या मागचा हेतू होता.यावेळी विभागातील महिलांनी मागील वर्षी वाटप केलेल्या झाडाच्या आठवणी सांगितल्या ते झाडांनी आमच्या बाल्कनीत आमच्या घरात कुंडीमध्ये लावले आहे आणि त्याची जोपासना करीत आहोत अशा आठवणी यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी सांगितल्या.























