मुंबई: राज्य शासनाने राज्यातील शाळांसाठी एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. खरे तर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
बदलापूर येथे झालेल्या घटनेचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे मात्र शाळा प्रशासनाचा अनागोंदी अन चुकीचा कारभार सुद्धा उघडकीस आला.झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, तक्रार पेटी, कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाची दिरंगाई सुद्धा पाहायला मिळाली. १६ जूनपासून शाळा सुरू होणार असून शाळांमध्ये नियमांची अंमलबजावणी केली की नाही याची झाडाझडती घेण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापनाने नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास आधी समज देण्यात येणार असून तरी अंमलबजावणी कडे कानाडोळा तर संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शालेय शिक्षण विभागाने कठोर नियमावली जारी केली आहे.
शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार आणि नियमावलीनुसार आता राज्याताल प्रत्युक्र शाळत सासाटा व्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे, महत्त्वाची बाब म्हणजे त्याचे फुटेज किमान एक महिना जपून ठेवणे बंधनकारक राहणार आहे. शाळेत महिला शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबतही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत, नव्या नियमावलीनुसार पूर्व-प्राथमिक ते इयत्ता सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शक्य असल्यास महिला शिक्षकांची नियुक्ती करावी, असे सरकारकडून सूचित करण्यात आले आहे.मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती आल्यास संबंधित शैक्षणिक संस्था व्यवस्थापन/शिक्षक व शाळा यांनी अधिनियमातीत तरतुदीनुसार स्थानिक पोलीस स्टेशन अथवा विशेष किशोर पोलीस पथक यांना कळविणे बंधनकारक असणार आहे. एवढेच नाही तर शाळकरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता आता राज्यातील सर्वच शाळांमधील परिसरात ‘१०९८’ हा चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक लिहून ठेवावा असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, मुले शाळेत अनुपस्थित असल्यास, त्याची त्वरित माहिती पालकाना मेसेजद्वारे कळवणे सुद्धा आवश्यक राहणार आहे. मानसिक दबाव किंवा त्रासातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्याचे सुद्धा निर्देश या नियमावलीत देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे विद्यार्थ्यांना गुड टच’ आणि ‘बॅड टच’ विषयी जागरूक करणे, हे शाळांचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.याशिवाय शाळेत कार्यरत असणारे शिक्षकेतर कर्मचारी जसे की बसचालक व इतर कर्मचारी यांची नियमितपणे अल्कोहल चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आता प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला कर्मचारी असावी, असाही नियम तयार करण्यात आला आहे.























