बदलापूर : बदलापूर शहरातील महाविकास आघाडीने सोसायटी अथवा मीटर धारकांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता महावितरणकडून डिजिटल मीटर लावले जात आहेत, या डिजिटल मीटरमुळे अव्वाचे सव्वा बिल नागरिकांना येत आहेत .या डिजिटल मीटरची सक्ती महावितरणने शहरात करू नये .यासाठी बदलापूर पूर्वेच्या महावितरण कार्यालयावर महाविकास आघाडीने धडक मोर्चा काढला होता. या आंदोलनकर्त्यांविरोधात महावितरणे आता गुन्हा दाखल केला. त्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
महावितरणने टी.ओ.डी. मीटर आणले आहेत.नवीन वीज जोडणीसाठी असूद्या किंवा सदोष अथवा नादुरुस्त मीटर बदलताना तुम्ही जर टी.ओ.डी. मीटर लावलं तर त्याचा फायदा होतो आहे असं महावितरणचे म्हणणे आहे. हे मीटर म्हणजे प्रीपेड मीटर नाहीत. तर सध्याच्या मीटर प्रमाणे म्हणजेच पोस्टपेड आहेत. हे मीटर वापरल्यानंतर त्याचं दरमहा बिल येईल. असे महावितरण चे म्हणणे असले तरीसुद्धा ज्या नागरिकांनी टी.ओ.डी. मीटर लावले आहेत त्यांना अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने नागरिकांमधून टी.ओ.डी. मीटर संदर्भात संताप व्यक्त होत आहे.डिजिटल मीटरमुळे अव्वाचे सव्वा बिल नागरिकांना येत असल्याने महावितराणाच्या भोंगळ कारभारावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला होता.
महावितरण कार्यालयावर काढलेला मोर्चा हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी होता. डिजिटल मीटरमुळे नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने त्याची दखल महावितरण घ्यावी याकरिता आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनानंतर महावितरण विभागाने देखील तात्काळ पत्रक काढून मिटर बदली ला कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही व मिटर बदलताना ग्राहकांच्या संमतीने मिटर बदली करण्यात येतील असे लेखी आश्वासन महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले. दुसरीकडे मात्र महावितरण विभागाने आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने नागरिकांमार्फत आश्चर्य व्यक्त होत आहे.
महावितरण विभागाने इ राजकीय दबावपोटी महाविकास आघाडीच्या नेत्याविरोधात गुन्हा दाखल केल्या की काय अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे.























