मुंबई : राज्य शासनाने महसूल सेवक(कोतवाल) या पदावर नियुक्त्या देताना लहान कुटुंबाचे प्रतिजापत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. यापुढे होणाच्या नियुक्त्यांसाठी हे प्रतिजापत्र बंधनकारक असणार आहे.
हा शासन निर्णय लागू झाल्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर जर कार्यरत महसूल सेवकांना तिसरे आपत्य झाल्यास तेही अपात्र ठरणार आहेत. शासनाने सोमवारी (ता. २) याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोतवाल पदासाठी यापुढे लहान कुटुंब ही अट असेल. लहान कुटुंब म्हणजे दोन मुले व पती, पत्नी असा आहे. हा शासन निर्णय अंमलात येण्याच्या तारखेस दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या व्यक्तीला या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या तारखेस असलेल्या मुलांच्या संख्येत जोपर्यंत वाढ होत नाही, तोपर्यंत अनर्ह ठरविण्यात येणार नाही. तसेच शासन निर्णय अंमलात येण्याच्या तारखेपासून एका वर्षात एकाच प्रसूतीमध्ये जन्मलेले मूल किंवा मुले या नियमात नमूद केलेल्या अनर्हतेच्या प्रयोजनासाठी विचारात घेण्यात येणार नाही.























