बदलापूर :परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून बदलापूर बेलवली विभागातील विद्यार्थ्यांकरिता शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत राबविण्यात येत आहे.सदर कार्यक्रमाला कॅप्टन आशिष दामले यांच्यासहित प्रभाकर पाटील,प्रियांका दामले आणि पक्षाचे अनेक सहकारी मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान यातच आमचे समाधान आहे ,असे मत यावेळी कॅप्टन आशिष दामले यांनी व्यक्त केले.तसेच सातत्याने गेली अनेक वर्ष हा उपक्रम यशस्वी रित्या पार पडला जातो यासाठी त्यांनी आपल्या सर्व टीमचे आभार हि मानले. दरवर्षी अधिकाधिक विध्यार्थ्यांना याचा लाभ घेण्यात यावा यासाठी आम्ही प्रयन्तशील असतो,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.























