Homeताज्या बातम्याबदलापूर बेलवली भागातील रेल्वे भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला; वाहतूक कोंडी कमी होण्याची...

बदलापूर बेलवली भागातील रेल्वे भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा!

बदलापूर :बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात लोकसंख्या आणि पर्यायाने वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. त्या तुलनेत बदलापुर शहरात पूर्व पश्चिम प्रवासासाठी मार्गांची उभारणी झाली नाही. बदलापूर शहरात दोन दशकांपूर्वी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. तर बेलवली भागात रेल्वेचा भुयारी मार्ग उभारण्यात आला. या मार्गात सातत्याने पाणी साचते. त्यामुळे येथील वाहतूक बंद होते. मात्र ज्या वेळी हा मार्ग सुरू असतो त्यावेळी असंख्य लहान वाहने, शाळेच्या बस, रिक्षा या मार्गातून प्रवास करतात. हा वाहनांचा भार शहरातील एकमेव उड्डाणपुलावर पडत नाही.शहरांतर्गत वाहतुकीसाठी महत्वाचा असलेल्या बेलवली भागातील हा रेल्वे भुयारी मार्ग सोमवारी सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या भुयारी मार्गात २६ मे रोजी एक चारचाकी पाण्यात अडकल्यानंतर येथील जोड रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले होते.हा मार्ग बंद असल्याने बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपुलावर कोंडी होत होती. त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसत होता.मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बदलापूर शहराला पावसाने झोडपले. त्यावेळी २६ मे रोजी या भुयारी मार्गात पाणी साचले होते. एका चारचाकी चालकाने धाडस करत यात वाहन घातले. मात्र पाणी अधिक असल्याने चारचाकी वाहन पाण्यात अडकून पडले. चालकाने कसाबसा जीव वाचवला. त्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी चारचाकी बाहेर काढली. मात्र त्यानंतर हा भुयारी मार्ग बंद करण्यात आला. भुयारी मार्गाला जोडणाऱ्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांच्या जोड रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे भुयारी मार्ग जवळपास २५ दिवस बंद होता. या काळात शहरातील वाहतूक एकमेव उड्डाणपूलावर होत होती. परिणामी दिवसातून अनेक वेळा या उड्डाणपुलावर कोंडी होत होती. तासनतास अनेक वाहने अडकून पडत होती. शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत होता. त्यामुळे भुयारी मार्ग तातडीने सुरू करायची मागणी होत होती. कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी सोमवारी सायंकाळी याची पाहणी करत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहनांच्या संख्येत काही अंशी घट झाली असून नागरिकांचा फेराही वाचला आहे. भुयारी मार्ग खुला झाल्याने शहरातील उड्डाणपुलावरच्या कोंडीवर परिणाम होईल अशी आशा आहे. मात्र त्याचवेळी शहरात नवा उड्डाणपुल तातडीने उभारण्याची मागणीही जोर धरते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जुन्नरमध्ये ताज्या बिबट्याच्या हल्ल्यात 27 वर्षीय तरुण जखमी

0
पुणे : जुन्नरच्या वडगाव आनंद गावात शनिवारी संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्याने पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावरील जंगलाच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे....

कोरड्या वायव्येकडील वाऱ्यांमुळे पुणे जिल्ह्य़ात तापमान एकांकिकेपर्यंत पोहोचते

0
पुणे: किमान तापमानात सातत्याने घसरण सुरूच राहिल्याने, रविवारी ग्रामीण पुण्यातील काही भागांमध्ये एक अंकी घसरण झाल्याने, हंगामातील सर्वात थंड सकाळ ठरली.हवेली हे ठिकाण सर्वात...

MVA च्या ‘अधिक अनुकूल’ सल्ल्या असूनही काँग्रेस BMC मध्ये एकट्याने जाणार आहे

0
पुणे: काँग्रेसने शनिवारी जाहीर केले की ते बृहन्मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी) आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, परंतु बिहारमध्ये पक्षाला नुकताच झालेला धक्का लक्षात घेऊन...

पिंपरखेड गावात बिबट्यासोबत झालेल्या चकमकीत महिला हादरली

0
पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड गावात शेतात काम करणाऱ्या महिलेला शुक्रवारी दुपारी काही अंतरावर असलेल्या झाडावरून अचानक बिबट्याने उडी मारल्याने तिला धक्काच बसला. घाबरलेली...

सव्र्हिस रोडमुळे प्रवाशांना धोकादायक महामार्गावर जाण्यास विलंब होतो

0
पुणे: नवले पुलाजवळील नर्हे वाय-जंक्शन येथे सेवा रस्ते बांधण्यास होणारा विलंब प्रवाशांना त्रास देत आहे जे म्हणतात की ते गर्दीच्या वेळी NH-48...

error: Content is protected !!