बदलापूर: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वांगणी बदलापूर रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. वांगणी मधल्या गणेश घाटाजवळ पुलावरील लोखंडी रेलिंगच गायब झालेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होतीये. कल्याण कर्जत महामार्गावरील वांगणी बदलापूर रस्त्याच्या कॉंक्रेटीकरण्याचं काम गेल्या वर्षभरापासून सुरु आहे, मात्र ठेकेदाराची मनमानी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे या रस्त्याच्या कामाचा दर्जा राखला जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे . या रस्त्यावरील गणेश घाटाजवळ असलेल्या पुलावरील एका बाजूचे रेलिंग पूर्णपाने गायब झालेत. या रस्त्यावर भरधाव वेगात वाहने जात असतात. शिवाय पावसाळ्यात हा ओढा दुथडी भरून वाहत असतो. त्यामुळे या ठिकाणी सावित्री नदी दुर्घटनेसारखी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघाताची भीती लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाभोवती तात्काळ स्वरंक्षक कठडा बांधावा किंवा लोखंडी रेलिंग लावावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे .























