बदलापूर : अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे इंजिन बंद झाले आणि त्या विमानातील पायलटनी MAYDAY MAYDAY असा संदेश पाठविला, परंतू एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून आलेल्या प्रतिसादाला पायलटकडून काहीच उत्तर आले नाही. या विमानाचे मुख्य पायलट क्लाईव्ह कुंदर आणि दोन को-पायलट दीपक पाठक व सुमित सबरवाल यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतू त्यांच्याकडे वेळच नव्हता. यामुळे विमान विमानतळावर न कोसळता रहिवासी भागात कोसळले. हे दोन्ही को-पायलट मुंबई आणि बदलापूरचे रहिवासी आहेत. दीपक पाठक हे बदलापूरचे आहेत. दीपक ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे तर दुसरे को पायलट सुमित सबरवाल हे पवईचे रहिवासी आहेत. सुमित यांच्या घरी त्यांचे ८८ वर्षांचे वडील एकटेच आहेत.























