बदलापूर: एअर इंडिया फ्लाइट १७१ हे भारतातील अहमदाबाद विमानतळावरून लंडन, इंग्लंडमधील गॅटविक विमानतळाकडे जाणारे नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान होते, जे १२ जून २०२५ रोजी टेकऑफनंतर लगेचच अहमदाबादमध्ये कोसळले. या दुर्घनेत मृत्युमुखी पडलेले क्रू मेंबर दीपक पाठक यांचे पार्थिव बदलापुरातील त्यांच्या राहत्या घरी आज शनिवार रोजी दाखल झाले. आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर दीपक पाठक यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पार्थिव दाखल होताच नातेवाईक आणि पाठक यांचा मित्र परिवार यांनी गर्दी केली आहे. पार्थिव दाखल होताच नातेवाईकांनी आक्रोश केला. शेजारी,मित्र मैत्रिणी, उपस्थित नागरिक सर्वांचेच डोळे पाणावले. सर्वांच्या उपस्थितीत दीपक पाठक यांना शेवटचा निरोप देण्यात येत आहे. दीपक पाठक यांना भावपूर्ण श्रद्धांजली!























