Homeताज्या बातम्याअंबरनाथ नगरपालिकेच्या आरक्षित जागेवर उभारलेल्या बांधकामांवर पालिकेने केली कठोर कारवाई!

अंबरनाथ नगरपालिकेच्या आरक्षित जागेवर उभारलेल्या बांधकामांवर पालिकेने केली कठोर कारवाई!

अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरांच्या सीमेवर वसलेल्या वडवली येथील लोटस तलाव आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या आरक्षित जागेवर उभारलेल्या ९२ अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी पालिकेने कठोर कारवाई केली. लोकप्रतिनिधींचा दबाव झुगारत आणि पोलिस बंदोबस्तात राबवलेल्या या मोहिमेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली, तर परिसरातील बजबजपुरी कमी होऊन नागरिकांना मोकळा श्वास घेता आला. अंबरनाथ शहरात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढत आहे. विशेषतः वडवली येथील निसर्गरम्य तलाव परिसर आणि पालिकेच्या उद्यान व जलतरण तलावासाठी टपऱ्या आणि पक्की बांधकामे उभारली होती. यामुळे या परिसरात आठवडी बाजार भरू लागला आणि नागरिकांचा वावर मर्यादित झाला होता. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संख्ये यांनी आपल्या पथकासह गुरुवारी सकाळपासून या परिसरात धडक कारवाई राबवली. यावेळी मुख्याधिकारी स्वतः उपस्थित राहून कारवाईवर देखरेख ठेवत होते. या मोहिमेत २२ व्यावसायिक दुकाने, २० टपऱ्या आणि ५० अन्य बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे वडवली तलाव परिसर पुन्हा मोकळा आणि स्वच्छ झाला असून, नागरिकांना त्यांचे विरंगुळ्याचे ठिकाण परत मिळाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षक पात्रता चाचणी अनिवार्य करण्याच्या विरोधात 24 नोव्हेंबर रोजी शिक्षकांनी आंदोलनाची योजना आखली आहे

0
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्याच्या राज्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ राज्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांनी 24 नोव्हेंबर रोजी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी...

इंधन वाहून नेणाऱ्या टँकरच्या चालकाच्या केबिनला आग, अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी...

0
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथे सोमवारी सकाळी 9.30 च्या सुमारास इंधनाच्या टँकरच्या चालकाच्या केबिनला आग लागल्याने अग्निशमन दलाने वेळीच कारवाई केल्याने...

खराब रस्ते आणि रहदारीची कोंडी असतानाही पुण्यात हाय-एंड कारची मागणी जास्त आहे

0
पुणे: खराब रस्ते, खड्डे आणि न संपणारे खड्डे यामुळे हायएंड गाड्या घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी कमी झालेली दिसत नाही.पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO)...

AI-आधारित निवारण प्रणाली दिव्यांग लोकांसाठी सुरू होते

0
पुणे: राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाने व्हॉट्सॲपवर एआय-संचालित चॅटबॉट सादर केला आहे, ज्याची रचना दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजनांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि स्क्रीनवर फक्त एका स्पर्शाने...

लाडकी बहिण योजना कधीच बंद होणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य.

0
ठाणे : कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही, असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिले. शिवसेना...

error: Content is protected !!